कृषी ग्रुप जॉईन करा

Soybean Anudan | या शेतकऱ्यांचे प्रलंबित सोयाबीन अनुदान येणार खात्यात । पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रानो. मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०१६-१७ मधील प्रलंबित असलेल्या अनुदान त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.  यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे. 

मित्रानो राज्यामध्ये 2016-17 मध्ये सोयाबीनचे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. याच पार्श्वभूमीवरती सोयाबीन च्या दारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी 10 जानेवारी 2017 मध्ये एक शासन निर्णय घेऊन ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये आपल्या सोयाबीनची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. 

मित्रांनो याच मंजुरीच्या अधीन राहून आपण जर पाहिलं तर राज्यातील 15 खाजगी बाजार संस्था आणि सोहळा थेट  परवानाधारक यांच्याकडे सोयाबीन विक्री केल्याने शेतकऱ्यांना या सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळणार होता. त्यासाठी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एकूण 113.12 कोटी एवढे निधीचे वितरण एवढे निधीची तरतूद करण्यात आलेली होती. 

मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्याकरता 1 कोटी 61 लाख 51 हजार 782 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

यांच्या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj