Crop Insurance नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सन 2022 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे (Financial) वितरण करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हजार 345 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

येथे क्लिक करून पहा जिल्ह्यांची यादी
कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार
शेतकऱ्यांना किती मिळणार लाभ ?
या शासन निर्णयाअंतर्गत 3 हजार 456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर यामध्ये जिरायत शेतीच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत.
बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.

शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Crop Insurance कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत ?
जालना जिल्ह्यातील 6,898 शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील 1,557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी 60 लाख रुपये. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 12,370 शेतकऱ्यांसाठी 157 कोटी 4 लाख रुपये. नांदेड जिल्ह्यामधील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख.
लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी 30 37 कोटी 30 लाख रुपये, तर उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. एकूण औरंगाबाद विभागासाठी 10 लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांसाठी 1 हजार 8 कोटी 30 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी 18,467 शेतकरी 11 कोटी 24 लाख रुपये. धुळे जिल्ह्यामधील 4,497 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 39 लाख रुपये. नंदुरबार जिल्ह्यामधील 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये, तर जळगाव Crop Insurance जिल्ह्यामधील 11,424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी 21,410 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 91 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
अशाप्रकारे इतर जिल्हे देखील पात्र झाले आहेत त्यांनाही या मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.

येथे क्लिक करून पहा जिल्ह्यांची यादी कोणत्या
कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार