बापरे! 100 टक्के अनुदानावर मिळणार शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन, या ठिकाणी अर्ज करा | Shilae Zerox Mashin

लोकसुत्र अधिकृत

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता राबवण्यात येत असतात, व अशाच प्रकारे समाज कल्याण विभागांतर्गत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

घर बसल्या स्वयंरोजगार चालू करता येणाऱ्या नागरिकांना यात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण झेरॉक्स मशीन कोणतीही महिला किंवा पुरुष चालवू शकतो त्यामुळे एक प्रकारची रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध होईल. तसेच महिलांसाठी अत्यंत उत्तम व्यवसाय मानला जाणारा शिलाई मशीन चा व्यवसाय याकरिता शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन सुद्धा देण्यात येईल.

जिल्हा परिषद योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येईल परंतु त्याकरिता अर्ज करावा लागणार आहे, व त्यासंबंधीची शेवटची तारीख सुद्धा देण्यात आलेली असून संबंधित तारखे पर्यंत अर्ज करता येईल. 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

यांनी करावा अर्ज

योजने अंतर्गत दिव्यांग व मागासवर्गीय व्यक्ती अर्ज करू शकेल, खुल्या प्रवर्गातील नागरिकांना अर्ज करता येणार नाही कारण ही योजना त्यांच्यासाठी नसेल.

अर्ज कुठे करावा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अर्ज जमा करावा लागेल त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. सध्या जालना जिल्ह्यात अर्ज सुरू झाले आहेत, उर्वरित जिल्ह्यांत देखील अर्ज सुरू होतील.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • दिव्यांग प्रमाणपत्र
free silai machine news marathi lokmat

अशाप्रकारे वरील संपूर्ण कागदपत्रे अर्जासाठी आवश्यक असणार आहे, त्यामुळे अर्जदाराकडे संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असेल, तर अर्ज समाज कल्याण विभागाकडे जमा करावा.

रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी, तुम्ही पात्र आहात का? 

https://www.digishivar.in/agrowon/13911/
Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj