कृषी ग्रुप जॉईन करा

RBI Action On Bank : RBI कडून पाच बँकांवर बंदी, ‘या’ बँकामधून ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RBI Bank Corporate Action: RBI ने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा देखील समाविष्ट आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

आर्थिक स्थितीचे कारण देत RBI ने 24 फेब्रुवारी 2023 पासून 5 सहकारी बँकांवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, केंद्रीय बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ते नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही.

RBI ने यापैकी 3 बँकांवर अंशतः ठेवी काढण्यावर निर्बंध लादले आहेत आणि इतर दोन बँकांवर पूर्ण निर्बंध लादले आहेत.

RBI ने सांगितले की, बँकेच्या पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. आरबीआयच्या सूचनांचा मुद्दा आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला म्हणून घेऊ नये.

या बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग कामकाज चालू ठेवू शकतात. यापूर्वी देशातील कमकुवत सहकारी बँकांवर कारवाई करताना आरबीआयने त्यांच्या बँकांचे परवानेही रद्द केले आहेत.

इथे क्लिक करून बँकेचे नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj