Kapus Bajar Bhav मागील महिनाभरापासून कापूस बाजाराचे (Cotton Market) लक्ष युएसडीएच्या (USDA) अहवालाकडं होतं. युएसडीए जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज कमी करेल, असं वाटतं होतं. पण युएसडीएनं उत्पादनासह वापरही कमी केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नरमला.
देशातील वायदेही तुटले. बाजार समित्यांमध्ये संमिश्र स्थिती राहीली. पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता धीर धरावा. सध्या उद्योगांकडून कापूस दरावर दबाव आणण्याचे काम सुरु असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सर्वप्रथम आपण युएसडीए म्हणजेच अमेरिकेचा कृषी विभाग काय म्हणतो ते पाहू… युएसडीएनं डिसेंबरचा अहवाल नुकताच प्रसिध्द केलाय. युएसडीए आपल्या अहवालात जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करेल हे अपेक्षितच होतं. पण युएसडीएनं कापूस उत्पादनासोबत वापराचा अंदाजही कमी केलाय.

सध्या कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. पण शेतकऱ्यांनी धीर धरावा. युएसडीए मागील चार महिन्यांपासून जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करत आहे. तर चीनमधील मागणी वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सुधारण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.