Online Satbara Utara : देशातील कृषी क्षेत्रात गेल्या काही दशकात मोठा अमुलाग्र असा बदल झाला आहे. या स्मार्टफोनच्या युगात कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वावर वाढला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील कृषी क्षेत्र अधिकच गतिमान होण्यास मदत मिळाली आहे.
कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असो किंवा इतर कोणतीही माहिती असो सर्व कामे आता ऑनलाइन केली जात आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्जाला अधिक प्राधान्य दिले आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक सातबारा उतारा आणि आठ अ उतारा देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.
म्हणजेच शेतकरी बांधव आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर आपल्या शेता जमिनीचा सातबारा उतारा आणि आठ अ चा उतारा ऑनलाइन सहजरीत्या प्राप्त करत आहेत. मात्र आता ही सेवा बंद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्याने सातबाराचे डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालयात उपलब्ध असल्याचे संकेतस्थळावर नमूद केले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन सातबारा उतारा शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
खरं पाहता शेतकरी बांधवांसाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना आणत असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ अ चा उतारा आवश्यक असतो. या कागदपत्राविना शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत तलाठी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने उतारा काढणे ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे.
अनेकदा तलाठी कार्यालयात शेतकरी बांधव उतारा काढण्यासाठी जातात मात्र त्या ठिकाणी कार्यालयात बंद राहते यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस वाया जातो. शिवाय वेळेत सातबारा उतारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट वाढते. दरम्यान शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन शासनाने ऑनलाइन पद्धतीने सातबारा आणि आठ चा उतारा उपलब्ध करून दिला आहे.
मात्र आता डिजिटल सातबाऱ्यांची ही सेवा बंद आहे. यामुळे शेतकरी बांधवांना उतारा काढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे आता शेतकरी बांधव संतप्त झाले असून लवकरात लवकर ही सेवा पुन्हा एकदा बहाल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.