New Year Celebration : 2022चा निरोप घेत संपूर्ण जगाने 2023 चं नवीन वर्ष म्हणून स्वागत केले आहे. आज सध्या जगातील 200 हून अधिक देश केवळ ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन करतात. म्हणजे तिथली सगळी कामं अधिकृतपणे जानेवारीपासून सुरू होऊन डिसेंबरपर्यंत चालतात. प्रत्येक प्रक्रियेतील सर्व काही या कॅलेंडरप्रमाणे चालते.
पण ग्रेगोरियन हे एकमेव कॅलेंडर नाही. याशिवाय अनेक कॅलेंडर प्रमाणे हिंदू कॅलेंडर म्हणजेच विक्रम संवत हे देखील एक लोकप्रिय कॅलेंडर आहे. पण गंमत म्हणजे हे कॅलेंडर तयार करणारा भारतही प्रत्येक कामात ग्रेगोरियन कॅलेंडरला प्राधान्य देतो. मात्र जगात असाही एक देश आहे, जिथे काम ग्रेगोरियननुसार होत नाही तर हिंदू कॅलेंडरनुसार केले जाते.
हेही वाचा: Saur Urja Kusum Yojana : कुसुम सौर ऊर्जा कृषी पंपाचे पुन्हा अर्ज सुरु, या जिल्ह्यात कोटा उपलब्ध
सन १९५४ पासून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने हिंदू कॅलेंडर म्हणजेच विक्रम संवत हे ग्रेगोरियन फॉरमॅट स्वीकारले असले तरी आपल्या देशाचे सर्व कामकाज ग्रेगोरियन कॅलेंडरच्या फॉर्मेटमध्येच चालते. मात्र आपला शेजारी असणारा देश ‘नेपाळ’ने नेहमीच हिंदू कॅलेंडरचे पालन केले आहे. त्याला विक्रमी कॅलेंडर असेही म्हणतात. हे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या 57 वर्षे पुढे चालते. याला विक्रम संवत कॅलेंडर असेही म्हणतात.
हेही वाचा: Online Land Record : आता घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा पहा ऑनलाईन
विक्रम संवत, बिक्रम संवत किंवा विक्रमी कॅलेंडर भारतीय उपखंडात 57 ईसवि सनपूर्व पासून तारखा आणि वेळा मोजण्यासाठी वापरले जात आहे. हे हिंदू कॅलेंडर नेपाळचे अधिकृत कॅलेंडर आहे. तसे, ते भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात वापरले जाते.
