50 Hajar protsahan anudan full process । नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकसुत्र मध्ये आज आपण पन्नास हजार रुपये अनुदान संदर्भात एक नवीन अपडेट जे आले आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि आता ५० हजार रुपये अनुदान बँकेत जमा होण्याची नेमकी प्रोसेस काय असेल, तसेच कोणते शेतकरी पात्र आणि कोण असतील अपात्र याबाबत अगदी सोप्या भाषेत सर्व काही समजून घेऊयात. तर त्याचसाठी हा लेख शेवट्पर्यंत वाचा.
50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या आपल्या गावातील सीएससी CSC केंद्र आणि बँक येथे उपलब्ध होणार आहेत. तर त्यामध्ये काल एक नवीन अपडेट आलेले आहे.
सीएससी केंद्राला आता तिथे आपले लॉगिन म्हणजेच करायचे पर्याय उपलब्ध झालेला आहे. आणि वेबसाईट सुद्धा पुन्हा सुरु झालेली आहे.येणाऱ्या काही दिवसांमध्येच सीएससी केंद्रावर 50 हजार रुपयांच्या याद्या लवकरच उपलब्ध होतील.
आपण यादीमध्ये नाव हे CSC केंद्रावर जाऊन बघू शकतो आणि जर आपले यादीत नाव आले तर आपल्याला तिथे आधार नंबर द्यायचा आहे आणि आपली केवायसी करून घ्यायची आहे.केवायसी करण्यासाठी 10 रुपये शुल्क आकारावे असे पण सांगण्यात आले आहे.
50 हजार रुपयांच्या याद्या बघण्यासाठी वेबसाईट सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना या याद्या वैयक्तिक पाहता येणार नाही. त्यासाठी त्यांना सीएससी केंद्रावर जाऊन हे याद्या पाहाव्या लागतील.
सरकारने केलेल्या 50 हजार रुपये अनुदान घोषाने बद्दल दिनांक 29 जुलै रोजी नवीन जीआर आलेला आहे. तो खालीलप्रमाणे दिलेले आपण वाचू शकता किंवा खाली दिलेल्या फोटोवर क्लिक करुन तो डाऊनलोड करू शकता.शेतकरी मित्रांनी जीआर नीट वाचावा त्याच्यामध्ये अनुदानासाठी पात्रता अटी नियम सर्व दिलेले आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

50 हजार रुपये अनुदान नियम व अटी

शेती हा विकासाचा पाया असल्याचे सरकारचे मत असल्याचे पवार यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान सांगितले होते. त्यांनी दावा केला की, प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि शेतकरी कल्याण योजनांसाठी 3,000 कोटी रुपये वेगळे ठेवण्यात आले आहेत. पवार यांनी हे वर्ष “महिला शेतकरी आणि कृषी कामगार सन्मान वर्ष” म्हणून घोषित केले जाईल आणि महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमधील 30% तरतूद वाढवून 50% केली जाईल, अशी घोषणा केली. त्यांनी असेही सांगितले की, आतापासून कृषी विभागाच्या योजनांमध्ये 3% निधी दिग्गजांना उपलब्ध करून दिला जाईल. crop loan list