MSP of Rabi Crop For Season 2023-24: दिवाळीपूर्वी देशातील लाखो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देत मोदी सरकारने आज पुढील रब्बी हंगामासाठी पिकाच्या एम एस पी ची घोषणा केली आहे. 2023-24 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किंमतची घोषणा केली आहे. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की सर्व पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ करण्यात आली आहे.

Cabinet approves MSP for all Rabi Crops for Marketing Season 2023-24
गव्हाचा एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल 110 रुपयांची वाढ
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की 2022-23मध्ये गव्हाचा एम एस पी 2015 रुपये प्रति क्विंटल इतका होता जो पुढील हंगामात 2023-24 मध्ये 2125 रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की गव्हाच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल 110 रुपयांची वाढ केली आहे .याशिवाय गेल्या हंगामात बार्लीचा एम एस पी 1635 रुपये प्रतिक्विंटल होता तो आता 1735 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे.
हे पण वाचा :- Soyabean Tokan Yantra Anudan | सोयाबीन मिळेल 50 टक्के अनुदान असा घ्या योजनेचा लाभ इथे करा ऑनलाईन अर्ज
मसूरच्या एम एस पी मध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ
मागील हंगामात हरभऱ्याला प्रतिक्विंटल 5230 रुपये भाव होता.तर 2023-24 हंगामाकरिता हरभऱ्याच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या हंगामात हरभरा 5334 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात येईल. देशातील मुख्य डाळ पीक असलेल्या मसूरच्या एम एस पी मध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ करण्यात आले आहे. मागील हंगामात मसुरची डाळ 5500 रुपये प्रति क्विंटल इतकी होती, तर 2023-24 हंगामात सरकार6000 रुपये प्रति क्विंटल या भावाने मसुरची डाळीची खरेदी करण्यात येईल.
हे पण वाचा :- Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! या कंपनीचे हे खते खरेदी न करण्याचे आवाहंन,आत्ताच यादी पहा?
मोहरीच्या आणि सूर्यफुलाच्या एम एस पी मध्ये ही वाढ
मोहरीच्या एमएसपी मध्येही प्रतिक्विंटल 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे गेल्या हंगामात 5050 रुपये प्रति क्विंटल या दराने मोहरीची खरेदी केली होती. चालू हंगामात 5450 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात येईल. याशिवाय सूर्यफुलाच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल 209 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे, गेल्या हंगामात 5441 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आले होते. या हंगामात सुर्याफुल 5650 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात येईल.
पिक | सन 2022-23 | सन 2023-24 |
---|---|---|
गहू | 2015 | 2125 |
हरभरा | 5230 | 5334 |
बार्ली | 1635 | 1735 |
मसूर | 5500 | 6000 |
मोहरी | 5050 | 5450 |
सूर्यफूल | 5441 | 5650 |
या पाच प्रमुख पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ झाल्याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे.गहू,बार्ली, हरभरा, मोहरी आणि सूर्यफूल ही देशातील पाच प्रमुख रब्बी पिके आहेत.देशात विविध भागांमध्ये याची लागवडीखालील क्षेत्र ही खूप आहे या पिकांचे एम एस पी मध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा जास्तीत जास्त भाव मिळणार आहे.
faq by MSP of Rabi Crop For Season
गव्हाच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल किती वाढ झाली आहे
110 रुपये
हरभरा पिकाचा 2023-24 भाव प्रति क्विंटल किती आहे
5334 रुपये
मोहरीच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल किती वाढ झाली आहे
400