Agriculture Loan Yadi | ‘या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा, यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता? - Loksutra

Agriculture Loan Yadi | ‘या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा, यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता?

Karjmafi Anudan 50000 Rupees Disbursed : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना : 2019 अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील 26 हजार 223 खातेदारांची माहिती पोर्टलवर www.jalnadccbank.com अपलोड करण्यात आली आहे. छाननी अंती पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

Emoji

या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा

इथे क्लिक करून याद्या डाउनलोड करा

यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता ?

कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्यात आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर होता.

दरम्यान, मंत्रीमंडळाने काही दिसवांपूर्वी प्रोत्साहन अनुदानास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांना त्यांच्याकडील प्रोत्साहन अनुदानास प्रात्र शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Emoji

या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा

यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता ?

यामध्ये जालना जिल्हा सहकारी बँकेने आघाडी घेत 26 हजार 223 शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. अन्य बँकांकडून या कामास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले .

दरम्यान, योनअंतर्गत 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधीत गृहित धरण्यात आला होता. 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास आणि 2018 -19 वर्षांतील अल्पमुदतीचे पीककर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास तसेच 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीचे पीककर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड केलेले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीच्या रकमेवर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

Leave a Comment