1 रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी नोंदणी कोठे करावी? Crop Insurance - Loksutra

1 रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी नोंदणी कोठे करावी? Crop Insurance

1 रुपयात पीक विमा याचा लाभ जर घ्यायचा असेल सर्वप्रथम आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी न केल्यास लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवा. ही नोंदणी आपल्याला PM किसान योजनेच्या वेबसाइट वर करता येणार आहे. जर घरी बसून ही नोंदणी करता येत नसेल तर आपल्या जवळील CSC सेंटर ला भेट देऊन ही नोंदणी करून घ्यावी…

Crop Insurance Scheme : शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकर्‍यांना फक्त 1 रूपयात पीक विमा (Crop Insurance) भरता येणार आहे. विम्यासाठी आता फक्त 1 रुपये एवढाच खर्च होणार आहे. हा खर्च आता राज्य सरकार करणार आहे. विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांकडे ऐन वेळेवर पैसे राहत नाही त्यामूळे आर्थिक स्थिती खराब असलेला शेतकरी पीक विमा (Crop Insurance) काढत नाही आणि त्याला पीक नुकसानीची मदत मिळत नाही. पण आता शेतकर्‍यांना विमा भरण्यासाठी लागणार्‍या खर्चाचे टेंशन घेण्याची गरज नाही. कारण आता शेतकर्‍यांना फक्त 1 रुपयात पिकांचा विमा काढून मिळणार आहे. त्यामूळे आर्थिक स्थिती खराब असलेल्या शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

Crop Insurance Scheme

शेतकरी बांधवांना केवळ 1 रुपयांत पिक विमा (Crop insurance) काढून मिळेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना विमा हप्त्याची 2 टक्के रक्कम भरावी लागणार असा नियम होता. आता मात्र शेतकर्‍यांवरचे हे ओझे महाराष्ट्र सरकारने कमी केले आहे.