Farmer loan waiver: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50000 हजार रुपये अनुदान - Loksutra

Farmer loan waiver: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50000 हजार रुपये अनुदान

Farmer loan waiver: या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोस्ताहन अनुदान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दोन लाखांवरील थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. परंतु आता नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तसेच सर्व बँकांकडून सरकारला माहिती प्राप्त झाली होती की, जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वाटप केले जाणार आहे. परंतु काही आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वितरित करण्यात आले नाही. परंतु आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वितरित होणार आहे.

मित्रांनो, सन 2022 या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे सन 2017-2018 सन 2018-2019 आणि सन 2019-2020 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018-2019 मध्ये घेतलेल्या पिक कर्ज रकमेवर हे 50 हजार रुपये दिले जाणार आहे. असे सांगण्यात आले होते पण आणखीन हे अनुदान मिळाले नाही.

ज्या शेतकऱ्यांनी सन 2018-19 मध्ये पिक कर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांना कर्ज एवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना देखील अनुदान मिळणार आहे.Farmer loan waiver