Loan Waiver मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार... - Loksutra

Loan Waiver मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार…

सरकार आल्यावर कर्जमाफीची घोषणा

अरविंद केजरीवाल यांनीही कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये आपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासोबतच पीक निकामी झाल्यास एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

विजेबाबत ही मोठी घोषणा केली

अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले तर ते १२ तास वीज देतील. शेतकऱ्यांना येथे रात्री वीज मिळते, दिवसाही वीज देऊ. त्याचबरोबर जमिनीचे सर्वेक्षण रद्द करून शेतकऱ्यांच्या मदतीने नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय नर्मदा धरणाच्या कमांड एरियातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पाणी पोहोचण्याची घोषणा करण्यात आली आहे.

English Summary: Loans of farmers up to Rs 2 lakh will be waived