mjpsky karjmafi list 2022 | या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होतील 50000 रुपये अनुदान याद्या - Loksutra

mjpsky karjmafi list 2022 | या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होतील 50000 रुपये अनुदान याद्या

ही योजना राबवत असताना 27 जुलै 2022 नुसार या योजनेची अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (mjpsky karjmafi list 2022) च्या पोर्टलच्या माध्यमातून ज्या प्रमाणे करण्यात आली त्याच प्रमाणे करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करत असताना सुद्धा तीच प्रक्रिया पार पाडली जाईल, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे mjpsky.maharashtra.gov.in या पोर्टल वर याद्या प्रकाशित होतील. यावर काही अपडेट आलं तर ते आपण पाहणारच आहोत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा ;

लाभार्थी याद्यासाठी हि आहे अधिकृत वेबसाईट

परंतु तोपर्यंत आपण ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या ठिकाणी जाऊन तसेच सोसायटीच्या माध्यमातून कर्ज परतफेड करत असला तर त्याठिकाणी जाणून संपर्क साधावा अन् आपलं नाव यादीत आहे की नाही ते पाहावं. आणि हे अनुदान 15 सप्टेंबर म्हणजे उद्या गुरुवारपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे.