Nuksan Bharpai GR - आता 13500 नव्हे, तर मिळणार हेक्टरी 27000 रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत, आत्ताच शासन निर्णय डाउनलोड करून वाचा - Loksutra

Nuksan Bharpai GR – आता 13500 नव्हे, तर मिळणार हेक्टरी 27000 रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत, आत्ताच शासन निर्णय डाउनलोड करून वाचा

Ativrushti Nuksan Bharpai Yadi : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे.

शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय महसूल व वन विभागाने 8 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केला.

Agricultural Compensation: एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. कारण शिंदे सरकारने राज्यातील सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती मदत…

जिल्हा मदत बाधित क्षेत्र 
जालना 3 कोटी 71,84,0002,311.79
परभणी 1 कोटी 60,34,0001,179
हिंगोली 157 कोटी 4,52,0001,13,620
नांदेड 717 कोटी 88,92,0005,27,491
लातूर 37 कोटी 30,8327.425
उस्मानाबाद90 कोटी 74,36,00066,723
एकूण   

दोन दिवसांत मदत मिळणार: कृषिमंत्री 

नुकसानभरपाईची घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसानभरपाईचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.

शासन निर्णय डाउनलोड करा

जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत….

शासन निर्णय डाउनलोड करा

जून ते ऑगस्ट, २०२२ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत….