Ration Card New Rules | राशन कार्ड मध्ये मोठा बदल हे राशन कार्ड होणार बंद - Loksutra

Ration Card New Rules | राशन कार्ड मध्ये मोठा बदल हे राशन कार्ड होणार बंद

Ration Card New Update : शासनामार्फत रेशनकार्ड संदर्भात वेळोवेळी योग्य ते बदल केले जातात. त्यामध्ये रेशनकार्डला Aadhar Linking असेल, कुटुंब प्रमुखाचे नाव जोडणे ( HOF ) असेल किंवा बोगस लाभार्थ्यांची नावे काढण्यासाठी इतर प्रक्रिया. अशाच प्रकारचा एक शासनामार्फत नवीन बदल राशनकार्डमध्ये केला जाणार आहे, लवकर नोकरदार, पेन्शनधारक, वाहनधारक शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच आता उत्पन्न वाढलेल्यांचे रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वरील नमूद नागरिकांचा शोध घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून संपूर्ण देशामध्ये रेशनकार्ड पडताळणी मोहीम सुरू होत आहे. तत्पूर्वी उत्पन्न वाढलेल्या कार्डधारकांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन रेशनकार्ड विभाग प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. परंतु नागरिकाचा या आव्हानाकडे योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता शासनाला नवीन पाऊल उचलणे भाग पडले आहे.

रेशन कार्डचा लाभ कोण घेऊ शकत नाही:-
तुमच्याकडे कार, एसी, ट्रॅक्टर यासारख्या वस्तू असतील तर
जर तुमचे घर 100 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल
आणि तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल
जर ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल,
शहरी भागात राहणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असेल.

… तर दंड होऊ शकतो

जर तुम्ही शिधापत्रिकेसाठी पात्र नसाल आणि तरीही तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने बनवले असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला ते सरेंडर करावे लागेल.

तुम्ही रेशन डीलर किंवा Ration Card कार्यालयात जाऊन ते सरेंडर करू शकता.

जर तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड बनवले असेल आणि तुम्ही ते सरेंडरही करत नसाल तर अशा लोकांवर कारवाई होऊन दंड आकारला जाऊ शकतो.

हे पण वाचा –