हे शेतकरी ठरतील ५० हजार रुपये अनुदानासाठी अपात्र । Reject List of 50 Hajar protsahan anudan Yojana in Marathi - Loksutra

हे शेतकरी ठरतील ५० हजार रुपये अनुदानासाठी अपात्र । Reject List of 50 Hajar protsahan anudan Yojana in Marathi

शेतकरी मित्रांनो, आपण शासनाने ठरवून दिलेल्या महत्वाच्या बाबी खाली नमूद केल्या आहेत. त्या अंतर्गत सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत –

१) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी..

२) महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.

३) केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

४) राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

५) शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

(६) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५००० पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).

७) कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)