Ladki Bahin Yojana | राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘ महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली असून लाखो महिलांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र अलीकडच्या काळात या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत.
लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना असून सध्या या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे आले आहेत. अनेक लाभार्थींना हप्ता वेळेवर मिळालेला नाही, तर काही नव्या महिलांना अर्ज करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता जून आणि जुलैचा एकत्र हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थींना अडचण, पण जुन्या महिलांना मिळणार एकत्रित हप्ता? जाणून घ्या सत्य काय आहे
सध्या या योजनेचे अधिकृत पोर्टल तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र महिलांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या महिलांना योजनेचा हप्ता मिळालेला नाही.
दरम्यान, जुन्या लाभार्थींमध्येही चिंता वाढली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. जुलैच्या सुरुवातीला काहींना रक्कम मिळाल्याची नोंद आहे, मात्र सगळ्यांनाच हप्ता मिळालेला नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्यांचे हप्ते एकत्र करून ३,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी घाबरून न जाता थोडा संयम बाळगावा, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी जुलै २०२४ ते मे २०२५ या कालावधीत काही महिलांच्या खात्यात एकूण १६,५०० रुपये (११ हप्ते) जमा झाले आहेत. परंतु सध्याच्या पोर्टल बंदमुळे, नव्या पात्र महिलांना अर्ज करता येत नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्जांची तपासणी सुरू असून सरकारने काही नवीन पात्रता निकष लावले आहेत. त्यामुळे जुने अर्ज तपासले जात आहेत. जे अर्ज नवीन निकषांत बसत नाहीत, त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
जर तुमच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नसेल, आणि तुमचं नाव यादीतून वगळलं गेल्याचा संशय असेल, तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपलं नाव यादीत आहे का हे तात्काळ तपासा.