कृषी ग्रुप जॉईन करा

Electricity Tower : शेतातून विजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती पैसे मिळतात ? जाणून घ्या सत्य!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Electricity Tower :- शेतात डीपी असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला मिळतात, आणि हा मोबदला वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो, असाही दावा या मेसेजमध्ये करण्यात आला असलेला मेसेज तुम्ही वाचलाच असेल तर वाचकहो या व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेसेज फेक (चुकीचा) असल्याचं वीज तज्ञांचं म्हणणं आहे.

“शेतातून डीपी किंवा विजेची लाईन जात असेल तर शेतकऱ्याला 5 हजार रुपये प्रती महिना मोबदला द्यावा, असा अद्याप तरी कायद्यात उल्लेख नाहीये.”

“शेतात डीपी असेल तर 5 हजार रुपये प्रती महिना मिळतात, हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. पण तो 100 % फेक आहे. 2003 मध्ये देशात वीज कायदा आला. 2005 मध्ये त्यात काही रेग्युलेशन आले. त्यात शेतातून लाईन किंवा ट्रान्सफार्मर असेल तर कंपनीनं संबंधित शेतकऱ्याला जमिनीचं भाडं द्यावं अशी तरतूद होती.

“पण त्याकाळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी या तरतुदीखाली मोबदल्यासाठी अर्ज केला नाही आणि मग पुढे ही तरतूद रद्द करण्यात आली.”

त्यामुळे शेतातील विजेच्या छोट्या लाईन्स किंवा डीपीसाठी मोबदल्याची काही तरतूद नाही

कायदा काय सांगतो?
महाराष्ट्रात महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) आणि इतर खासगी पारेषण कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचं जाळं टाकलं जातं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी ते गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मनोरे (टॉवर) उभारले जातात.

महाराष्ट्र सरकारनं 1 नोव्हेंबर 2010 रोजी शासन निर्णय काढला. त्याअंतर्गत शेतजमिनीत 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारलं जात असेल, तर त्यासाठीच्या मोबदल्यासंदर्भात आदेश जारी केले.

त्यानुसार, जमीन कोरडवाहू असेल, तर टॉवरसाठी जेवढी काही जमीन व्यापण्यात आली, तेवढ्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील सरकारी बाजारभावाच्या (रेडी रेकनर) 25 % मोबदला निश्चित करण्यात आला.

बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला रेडी रेकनरच्या 60% इतका निश्चित करण्यात आला.

Emoji

पुढे वाचा >> फक्त यांना मिळू शकतो मोबदला

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Electricity Tower : शेतातून विजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती पैसे मिळतात ? जाणून घ्या सत्य!”

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj